श्रीहरीकोटा- अंतराळ विश्वात भारताने नवी भरारी घेतली आहे. श्रीहरिकोटा येथून इस्त्रोकडून आज पीएसएलव्ही सी ४३ अंतराळ यानाच्या मदतीने तब्बल ३० उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात झेपावले आहेत. पृथ्वीचे निरीक्षण करणार्या हायसिस या भारतीय उपग्रहासहीत 8 देशांच्या 30 उपग्रहांचा यामध्ये समावेश आहे.
३० पैकी २३ उपग्रह हे
एकट्या अमेरिकेचे होते. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन यांच्या प्रत्येकी एक-एक उपग्रहाचा
समावेश आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी ४३चे गुरुवारी (२९ नोव्हेंबर)
सकाळी ९.५८ वाजता प्रक्षेपण
करण्यात आले.
पृथ्वीच्या
पृष्ठभागाचे निरीक्षण करणार्या हायसिसच्या मदतीने जमीन, पाणी, वनस्पती आणि अन्य
गोष्टींची माहिती मिळवता येणार आहे. प्रदुषणाची माहिती देण्यामध्ये या उपग्रहाची
सर्वाधिक मदत होईल. या उपग्रहाचे वजन ३८० किलो एवढे आहे.
दरम्यान, पीएसएलव्हीचे हे ४५ वे उड्डाण आहे.
एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम इस्त्रोच्या नावावर आहे.
इस्त्रोने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्वाधिक १०४ उपग्रहांचे
यशस्वी प्रक्षेपण केले होते.